Pune: अभिमानास्पद ! पुण्यातील शेतकरी मुलाच्या झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला पेटंट

Pune: पारगाव, ता. १७ : शिरदाळे (ता.आंबेगाव) या दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्याचा मुलगा बिपीन पंढरीनाथ चौधरी याने केमिकल विरहीत हर्बल पेस्ट कंट्रोलवर संशोधन केले व स्वतः हर्बल कीटकनाशक विकसित केले. झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या या हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे.

पावसावर अवलंबून असलेली शेती, बेताची घरची परिस्थिती अशा प्रतिकूल परिस्थिती काही तरी करण्याची जिद्द बिपीन यांच्या मनात होती. जे करायचे ते स्वतःपुरतं नाही तर आपल्यासोबत घराचे आणि गावाचंही भले व्हायला हवे. या विचाराने भारावून गेला होता. बिपीन यांना आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन बहिणी. त्याचे गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यांनतर शेजारील धामणी गावात बारावीपर्यंत शिक्षण. बारावीनंतर राजगुरुनगर (ता. खेड) येथील विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कौटंबिक अडचणींमुळे बी.एस्सी.पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

Mumbai : कल्याणातील वाहतूक कोंडीवर तोडगा; कल्याणात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पेस्ट कंट्रोलचा दुष्परिणाम नाही
बिपीन चौधरी यांनी स्थापन केलेल्या ''हर्बल पेस्ट कंट्रोल इंडिया प्रा. लि.’या उद्योगाला भारत सरकारच्या ''स्टार्टअप इंडिया''कडून मान्यता मिळाल्यानंतर २०१२ ला त्यांनी स्वतः काही हर्बल कीटकनाशके निर्माण केली व त्यांचा पेस्ट कंट्रोलमध्ये वापर सुरू केला होता. याने मिळणारा परिणाम तर चांगला होताच, शिवाय लोकांचा केमिकलचा होणारा त्रासही कमी झाला. केमिकल पेस्ट कंट्रोलचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याउलट ''हर्बल पेस्ट कंट्रोलचा दुष्परिणाम नाही. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला.

तरुणांना रोजगार उपलब्ध
बिपीन चौधरी यांनी २०१६-१७ मध्ये गावातच स्वतः विकसित केलेली हर्बल कीटकनाशकं उत्पादित करण्याचा उद्योग सुरू केला. यातून गावातील काही तरुणांना रोजगार मिळाला. त्‍यांनी झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे. इतरही काही उत्पादनांना पेटंट मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

हर्बल कीटकनाशकाच्या उद्योगासाठी पत्नी व मुलांचे सहकार्य मिळते. केवळ आर्थिक पाठबळ न मिळाल्याने केलेले हर्बल कीटक नाशकावरील संशोधन जिल्हा, राज्यासह
जागतिक स्तरावर पोहोचवू शकलो नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply