Prithviraj Chavan : पैशाच्या वापरावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले कितीही पैसे वापरा...

Prithviraj Chavan : निवडणूक रोखे, इन्कम टॅक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे व आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत घेण्यासाठी देखील पैशाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी केला. मात्र भाजपाने पैशाचा कितीही वापर केला, कितीही पैसे वाटले तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीलाच महाराष्ट्रात बहुमत मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले कि संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रचार यंत्रणेत काही त्रुटी होत्या, मात्र महाराष्ट्राचे कॉंगे्रस प्रभारी रमेश चेल्लीथाला यांनी बैठक घेऊन योग्य सूचना देऊन त्रुटी दूर करण्यात आल्या. निवडणुकीच्या सुरूवातीला भाजपाने 370 पार ची घोषणा दिली. या घोषणेचा अर्थ देशाची घटना बदलण्यासाठी 2/3 बहुमत संसदेत आवश्यक आहे, त्यासाठी 370 जागा हव्या होत्या. सत्य पुढे आल्यानंतर ही घोषणा बदलून 400 पार की घोषणा केली, जी नंतर हवेतच राहून गेली.

Ajit Pawar : अजित पवारांना धक्का! वेल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत वर्ष 2019 ला महाराष्ट्रात 6 सभा घेतल्या होत्या, मात्र यावेळी त्यांच्या आतापर्यंत 12 सभा झाल्या आहेत. महाराष्ट्राची निवडणुक अत्यंत महत्वाची असल्याने मोदींनी पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून दोन रात्री महाराष्ट्रात घालविल्या. नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष कामकाज केल्यानंतरही त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी व कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे. तसेच कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात जे लिहिलेले नाही, ते मुद्दे भाजपा पुढे आणत आहे. मोदींच्या सभांना गर्दी नाही, त्यांना प्रतिसाद देखील मिळत नाही. पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ येत आहे. आता तर मोदींची सभा नको असे सांगितले जात आहे.

निवडणूक रोखे माध्यमाने सर्वांत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याकरिता मोदी सरकार ने कंपनी कायद्यामध्ये देखील बदल केलेला आहे. हा बदल रद्द करणे आवश्यक आहे. पूर्वी राजकीय पक्षांना देणगी देण्याकरिता संबंधित कंपनी मागील 3 वर्षांच्या नफ्याच्या 7.5 टक्के रक्कम देणगी स्वरूपात देऊ शकत होती. मात्र हा बदल रद्द करणे आवश्यक आहे, कारण ही अट रद्द केल्याने ज्या कंपन्या फायद्यात नाहीत, त्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळेच भाजपाला जेवढे पैसे मिळाले आहेत ते निवडणुक आयोगाकडे जमा केले जावेत. विरोधी पक्षांवर दबाव आणून निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तसेच कॉंगेस पक्षाची विविध बँकांची खाती देखील सील करण्यात आली. भाजपाला निवडणुक जड जात असल्यानेच भाजपा मुद्यांवरून भरकटली आहे. त्याच्या विरूद्ध महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply