PM Modi : पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; देशातील पहिल्या ‘अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पा’चे करतील उद्घाटन .

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून ते आज कोलकात येथे १५ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान त्यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पाचंही उद्घाटन पार पडणार आहे. हा प्रकल्प सरकारच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक आहे.

कोलकात्यातील अंडर वॉटर मेट्रो प्रकल्प हा मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचाच एक भाग आहे. ही मेट्रो हुगळी नदीखालून जवळपास १६.६ किलोमीटरचा प्रवास करणार असून ती हावडा शहराला थेट सॉल्ट लेकशी जोडेल. यादरम्यान तीन मेट्रोस्थानके भूमिगत असतील, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर 

या उद्घाटन सोहळ्याला केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आज होत असले तरी ही मेट्रो काही दिवसांनंतर जनेतसाठी खुली करण्यात येईल, अशी माहिती पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. तसेच ही मेट्रो सेवा म्हणजे पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिलेली भेट असून पश्चिम बंगालमधील जनतेचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार होणार आहे, असेही ते म्हणाले.

याशिवाय आज पंतप्रधान मोदी कोलकात्यातील कवी सुभाष-हेमंता मुखोपाध्याय आणि तरातला-माजेरहाट मेट्रो प्रकल्पाचेदेखील उद्घाटन करणार आहेत. तसेच ते दुपारी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे पश्चिम बंगालमध्ये आगमन झाले. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांची भेट घेतली. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली

महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांचा मागील काही दिवसातला दुसरा दौरा आहे. दोन आठवड्यापूर्वीही ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हुगळी जिल्ह्यातील आरामबाग आणि नादियातील कृष्णनगर येथील विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. तसेच जाहीर सभांनाही संबोधित केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply