Orange Export : बांग्लादेशचा एक निर्णय अन् विदर्भातले संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत, अडीच लाख टन संत्रा पडून राहणार?

Orange Export: काही दिवसाआधी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. ज्याचा मोठा फटका बांग्लादेशला बसला. बांगलादेश सर्वाधिक  कांदा हा भारतातील आयात करत होता. मात्र केंद्र सरकारने भारतातील बांगलादेशमधून निर्यात होणारा कांदा थांबवल्यामुळे बांगलादेशाने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क वाढवून मोठी कोंडी केली आहे.

दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती (Amravti) व नागपूरचाच (Nagpur) आहे अशी जगभरात ओळख आहे. भारतातील 40 टक्के संत्रा हा बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो. मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर प्रतिकिलो 88 रुपये आयात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंकडून पक्ष विस्ताराला सुरुवात; ६ बड्या नेत्यांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांग्लादेशमधील निर्यात अर्ध्यावर आली आहे, तर दुसरीकडे देशांअंतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीची दर 60 ते 70 हजार रुपयांवरून 20 ते 25 हजार कोटी प्रती टनावर आले आहे. त्यामुळे तोडणी होऊन बाजारात आलेला संत्राला इथेही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

विदर्भात किमान 2 लाख 50 हजार हेक्टरवर संत्र्याचे क्षेत्र आहे. दरवर्षी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन विदर्भात घेतल जाते. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते तर यावर काँग्रेस नेत्या व  आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून देशात व बांगलादेश मध्ये सुद्धा संत्राला भाव नाही त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply