Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी हाती आली आहे. नाशिकमध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रवाश्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनसुसार, नाशिकच्या उपनगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एसटी बसला आग लागली. या घटनेने प्रवाश्यामंध्ये एकच भीती पसरली. नाशिकहून प्रवाश्यांना घेऊन ही बस शिर्डीकडे जात होती.

उपनगर परिसरात ही बस  पोहोचताच बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरून दिले.तर खबरदारी म्हणून यावेळी नाशिक-पुणे रोड वरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply