Nagpur News : सीताबर्डी बाजारपेठेत ४ जूनला बॉम्ब ठेवण्याची धमकी, नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणांची उडाली तारांबळ

Nagpur News : नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी बाजारातील दुकानात 4 तारखेला बॉम्ब ठेवणार असा फोन 112 वर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोध पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली मात्र, बाजारपेठेत काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही. खबरदारी म्हणून बाजारपेठेत गस्त वाढवण्यात आली आहे.

Pune Porsche Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सीताबर्डी बाजारातील मोदी नंबर 2 आणि मोदी न 3 बाजार ओळीमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. यात पोलिसांनी फोन आलेल्या नंबरची माहिती मिळाली असून या बाबत त्या नंबर वरून नेमका कोणी फोन केला याचा तपास सुरू असल्याची माहिती बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी दिली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply