Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरूवारी पाच तास बंद

Mumbai Pune Express Way: मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनकडून पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चिखले ब्रीज येथे गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवारी दिवसा पाच तासांसाठी एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे.

पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने जाणा-या मार्गिकेवर नुकताच गर्डर टाकण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईच्या दिशेने येणा-या मार्गिकेवर गुरूवारी गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १.१५ आणि दुपारी २ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत असा पाच तासाचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे ब्लाॅक कालावधीत द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईच्या दिशेने होणार वाहतूक बंद असणार आहे. दरम्यान वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याहून येणारी हालकी वाहने मुंबई-पुणे महामार्ग क्र. 48 वर वळवण्यात येणार आहेत. बसेस व इतर हालकी वाहने खोपोली एक्झिटवरून मुंबई-पुणे महार्गावर मुंबईच्या दिशेने वळवण्यात येतील. तर इतर जड वाहने खालापूर टोलनाका एक्झिटवरून मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना केली जाणार आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply