Torres Jewelers : टोरेस कंपनीचा भंडाफोड कसा झाला, कुठपर्यंत पसरलंय जाळं? गुन्हा नोंद होताच महत्वाची माहिती आली समोर

Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे आश्वासन दिले होते. १० टक्के व्याजदर देत असल्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीचं जाळं दादर ते मीरा रोडपर्यंत पसरलं होतं. मात्र, घोटाळा समोर आल्यानंतर आरोपींनी पोबारा केला आहे.

या कंपनीमध्ये अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली होती. काहींनी तर आयुष्याभर कमावलेली आयुष्यभराची कमाई यात गुंतवली होती. गुंतवलेल्या पैशांवर १० टक्के व्याजदर मिळेल या हेतूनं काहींनी गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणूकदारांना गंडा घालत आरोपी पसार झाले आहेत. या बोगस कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत.

Pune Crime : ऑफिसचा वाद, पार्किंगमध्ये तरुणीचा घात; चोपरच्या हल्ल्यात IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

नवघर पोलिस ठाण्यात टोरेस कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीविरुद्ध २६ जणांनी आपले जबाब नोंदवले असून, त्यात ६८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या मते, टोरेस कंपनीने लोकांचे पैसे डायमंडमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये उकळले आहेत. त्यामोबदल्यात मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचे देखील त्यांनी आश्वासन दिलं. याच आश्वासनाला बळी पडत लोकांनी हजारो रूपयांची गुंतवणूक केली होती.

टोरेस कंपनी भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात स्थित आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची आयुष्यभराची कमाई घेऊन पोबारा केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच लवकरच आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलंय. सर्वसामान्य नागरिकांना अशा फसवणुकीच्या गुंतवणूक योजनांपासून दूर राहण्याची आणि कोणत्याही संशयास्पद कंपनीबाबत सावध राहण्याची अपील पोलिसांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply