Mumbai News : वीज दरवाढविरोधात ठाकरे गट आक्रमक; टाटा पावर कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा

Mumbai News : टाटा पावर वीज कंपनीकडून संभाव्य दरवाढविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील मागाठाने येथील टाटा पॉवर कार्यालयावर आज शिवसैनिकांचा मोर्चा धडकलाय. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टाटा पावर कंपनीचा निषेध नोंदवला.

विधान परिषद आमदार विलास पोतनिस, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर आणि प्रवक्त्या संजना घाडी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक मोर्चात सहभागी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. टाटाने एमआरसीबीकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्याचा निषेध टाटा कार्यालयाच आम्ही करत आहोत. शंभर युनिटपर्यंत टाटा कडून तीन रुपये 45 पैसे घेतले जातात, मात्र आता दोनशे एक टक्के दरवाढ होणार आहे, असं आंदोलक, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटलं.

Mumbai Crime News : विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

दरवाढी संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान यांना देखील कळवणार आहोत. गरिबांना या वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. मात्र जास्त युनिट वापरणाऱ्यांचा वीज दरवाढीत अवघी दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

घोसाळकर यांनी उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट राज्यात आल्यापासून गुंडगिरी वाढते हे मी नाही तर त्याच गायकवाड यांनी सांगितले आहे. गायकवाड म्हणाले माझ्या मुलाला कुटुंबाला उध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून मी गोळीबार केला. गोळी घालून ते सांगतात मी शिंदे यांच्यामूळ गोळीबार केला. शिंदे यांची दादागिरी ठाण्यात वाढली आहे ती लवकरच संपेल, असं गायकवाड म्हणाले होते असं घोसाळकरांनी सांगितलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply