Mumbai Attack : 26/11 च्या हल्ल्याशीच नाही तर पुण्याच्या जर्मन बेकरीशीही आहे डेव्हिड उर्फ दाऊदचं कनेक्शन

Mumbai Attack: दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2008 च्या 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरलेला पाकिस्तान वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणा डेव्हिडचा जवळचा सहकारी आहे.

अमेरिकेन न्यायालयाने तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या विनंतीला मान्यता दिली आहे. राणा आणि हेडलीला ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती.

26/11 च्या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला मदत केल्याबद्दल राणाला 2011 मध्ये शिकागोमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

डेव्हिड उर्फ दाऊदला 26/11 च्या हल्ल्यातील सहभागाबद्दल 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, हेडली फक्त मुंबई हल्ल्यापुरता मर्यादित नव्हता तर पुण्यातील जर्मन बेकरी हल्यातही त्याचा सहभाग होता.

पुणे पोलिसांच्या नोंदीनुसार, हेडलीने जुलै 2008 आणि मार्च 2009 मध्ये दोनदा पुण्याला भेट दिली होती. फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबई विशेष न्यायालयासमोर बाजू मांडताना, हेडलीने असा दावा केला की, त्याने मार्च 2009 मध्ये भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मुख्यालयाचे सर्वेक्षण केले होते.

हे ऑपरेशन पाकिस्तानच्या ISI चे मेजर इक्बाल म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीच्या सूचनेनुसार केले होते. याशिवाय, हेडलीने सांगितले की, भारतात असताना दहा दिवसांत पुणे, गोवा आणि राजस्थानमधील पुष्कर येथील चबड हाऊसचीही तपासणी केली होती.

पुणे पोलिसांना संशय आहे की, त्याच्या भेटीदरम्यान हेडलीने घोरपडी क्रॉसिंगवरील रेल्वे लोकोमोटिव्ह डिझेल शेडलाही भेट दिली, जी कोरेगाव पार्क जवळ आहे. त्याने कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमालाही भेट दिली होती.

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार कोरेगाव पार्कमधील चबड हाऊसभोवती सर्वेक्षण करण्याचा हेडलीचा उद्देश असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.

असे मानले जाते की त्याने ज्यू अमेरिकन असल्याचे भासवत चबाड हाऊसला भेट दिली होती. योगायोगाने, हेडलीला 2009 मध्ये अमेरिकेत अटक केल्यानंतर त्याच्याकडून “हाऊ टू प्रे लाइक ज्यू” हे पुस्तक जप्त करण्यात आले होते.

फेब्रुवारी 2010 मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याआधी हेडलीला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. या खटल्यात आरोपी म्हणून त्याचे नाव नव्हते. मात्र आता त्याचा पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply