Maharashtra Politics : 'ते' पुन्हा येणार! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? नवी तारीख आली समोर

Mumbai : महायुतीच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर महायुतीच्या गोटातून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आहे. या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अखेर ठरला आहे. देवेंद्र फडणवीस ५ डिंसेबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *