MNS News : मनसेने भाकरी फिरवली; कल्याण शहर अध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची वर्णी

MNS News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यात. अशात आज कल्याण शहर अध्यक्ष पदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने डोंबिवली शहर अध्यक्ष पदी राहुल कामत यांची निवड केली होती. त्या पाठोपाठ आता कल्याण शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Nagpur Crime News : नागपूर पोलिसांची धडक कारवाई; ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका पाहता कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या जागी आता माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेने भाकरी फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश भोईर हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसे पक्ष स्थापनेपासून भोईर राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश भोईर मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 व 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. याच दरम्यान त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस ही जबाबदारी होती.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply