Metro: मूहूर्त ठरला! बीकेसी ते वरळी मेट्रो या दिवशी धावणार, ट्रायल सुरु

Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा पुढचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिकच सोपा होणार आहे. बीकेसी ते आचार्च अत्रे चौक म्हणजेच वरळी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो लवकरच धावणार आहे. यामुळे बीकेसी ते कुलाबा या मार्गात अजून काही स्थानके जोडली जाणार आहे.

सध्या बीकेसी ते वरळी या मार्गावरच्या मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावरील सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. यासाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांना बोलावले आहे. या चाचणीनंतर सीएमआरआस प्रमाणपत्र मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खूप सोपा होणार आहे.

Pune Crime : धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार, पुणे हादरले

 

एमएसआरसीकडून हा मेट्रो सुरु केला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या सध्या घेतल्या जात आहे. हा मेट्रो मार्ग खुला करण्यासाठी जी परवानगी लागणार आहे ती मिळाल्यानंतर लगेचच मेट्रो मार्ग सुरु केला जाणार आहे. यानुसार पुढच्या महिन्यात सीएमआरएसला तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या मेट्रोची ट्रायल रन सुरु आहे. याचसोबत कुलाबा ते आरेच्या मध्ये मेट्रो ३ च्या कॉरिडॉरची निर्मिती केली जात होती. विधानसभा निवडणुका होण्याआधी आरे ते बीकेसी मेट्रो सुरु झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा देखील सुरु केला जाणार आहे. या मेट्रो लाइनचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply