Maval : मावळच्या खोक्याला बेड्या, शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

Maval : वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांसची तस्करी करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. अशाच प्रकारे मावळमध्ये मांस तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. मावळमध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश विभागाला यश मिळाले असून एका घरातून तब्बल ५२ किलो मांस व शिकारीसाठी वापरण्यात येणारे शस्त्र जप्त करण्याची वनविभागाने मोठी कारवाई केली आहे.

मावळच्या टिकोना गावात वन विभागाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. टिकोना गावातील सिंग बंगल्यावर वनविभागाने अचानक धाड टाकत ५२ किलो वन्यजीव प्राण्यांची मास ताब्यात घेतले. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. टिकोनागाव) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याच्याकडुन ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत काडतुसे आणि शिकारी आणि सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मांसाचा नमुना तपासणीसाठी रवाना

वन विभागाकडून करण्यात आलेली संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र गोरेवाडा, नागपूर येथे तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळख करिता पाठविण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

वन विभागाकडून आवाहन

दरम्यान वन विभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वन कार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे वन विभागाने कळविले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply