Maharashtra Weather : राज्यात आज आणि उद्या या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; विदर्भात हुडहुडी कायम

Maharashtra Weather : राज्यात विदर्भ आणि कोकणात थंडीचा जोर कायम आहे. तर मुंबईसह इतर ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Weather News)

राज्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडक्यात सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशात याने शेतीचे नुकसान होऊ शकते. राज्यात सातत्याने हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांदा पिकावर करपा रोगाचा फैलाव होत आहे. जर मुसळधार पाऊस झाला तर कांदा पिकाचे आणखीन जास्त नुकसान होऊ शकते. या आधी परतीच्या पावसाने खरीप हंगामात पिकांच मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात २८ आणि २९ जानेवारीला ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडीची लाट थोडी कमी होऊ शकते. तसेच मुंबईमध्ये देखील थंडीची लाट कमी झाली असून आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे.

राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्याता आहे तर २९ जानेवारीनंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. पुढचे ४ ते ५ दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मध्य महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट येणार आहे. तसेत मुंबईतील किमान तापमान २ नोव्हेंबरपर्यंत सरासरीपेक्षा घसरण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply