Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या गडकरींना दिलेल्या ऑफरची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले,

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिला यादी जाहीर झाली आहे. लोकसभेच्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची नावे आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं या यादीमध्ये नाव नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर विरोधकांनी या मुद्दा लावून धरत भाजपवर निशाना साधला आहे.

यावरुन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या ऑफरचा समाचार घेतला आहे.

Sudha Murthy In Rajyasabha: ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड; PM मोदींनी केलं अभिनंदन

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देण्याचा प्रकार आहे.

नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा नितीन गडकरी यांच नाव त्यात नक्की असेल. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून कुणाचंही नाव नव्हतं. जेव्हा महाराष्ट्राची लिस्ट येईल, तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल. उद्धव ठाकरे असं बोलून स्वतःचं हासे करून घेत आहे, अशी टोला देवेंद्र फडणवीस यांनी लागवला.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

नितीन गडकरी यांनी भाजपमधून बाहेर पडावं. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू. दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो, राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणू,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply