Maharashtra-Karnataka Row : सुप्रीम कोर्टात हरीश साळवे मांडणार महाराष्ट्राची बाजू; अजित पवारांचा खुलासा

Maharashtra-Karnataka Row: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. या ठिकाणी महाराष्ट्राची बाजून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे हे बाजू मांडणार आहेत. तर कर्नाटकची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मविआच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, सीमावादावर काल दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडावी अशी मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे.

ज्यावेळी माझ्या कानावर आलं की, सुप्रीम कोर्टात कर्नाटकची बाजू मुकूल रोहतगी मांडत आहेत. तर हरिश साळवी हे महाराष्ट्राची बाजू मांडणार आहेत. साळवी हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत विदर्भातील आहेत. त्यांना या केसची बारकाईनं जाण आहे. त्यामुळं मी स्वतः याबाबचं पत्र उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यानंतर फडणवीसांनी मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो असं ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply