Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : आज सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी महाराजांचा जयजयकार केला.

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, 'छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत. त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो'.

Jejuri Khandoba Temple : आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, देवस्थानाकडून 'या' कपड्यांवर बंदी

'छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला 'छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत' पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले.

'मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, असेही अजित पवारांनी जाहीर केले.

'येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे पवारांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply