Maharashtra Board SSC Result : दहावीचा निकाल लागला! कोकण सर्वश्रेष्ठ, मराठवाड्याची काय स्थिती?

Maharashtra Board SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीतील लाखो विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. दरम्यान, या निकालात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. तर कोकण विभाग या निकालात अव्वल ठरला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या दोन विभागांनीदेखील यावेळी चांगली कामगिरी केली आहे. 

यंदाच्या परीक्षेत कोकण विभगाने मारली बाजी

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल  95.81 टक्के लागला आहे. एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी इयत्ता दहावीच्या कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकणात 99.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांत कमी निकाल हा नागपूर विभागाच आहे. या विभागात 94.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

Mumbai Rain : मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

मराठवाड्याचा निकाल काय? 

या वर्षी मराठवाड्यातील लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या दोन्ही विभागांचा निकाल हा 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 95.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर विभागात 95.27 टक्के लागला आहे. 

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

पुणे : 96.44 टक्के 
नागपूर : 94.73 टक्के 
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के 
मुंबई : 95.83 टक्के 
कोल्हापूर : 97.45 टक्के 
अमरावती :  95.58 टक्के 
नाशिक : 95.28  टक्के 
लातूर : 95.27 टक्के 
कोकण : 99.01  टक्के

यंदाही मुलींनीच मारली बाजी

सर्व विभागीय मंडळांतून मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.56 टक्के आहे. मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. एकूण 18 विषयांचा निकाल हा 100 टक्के राहिला आहे. 

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आता https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. मिळालेल्या गुणांची प्रिंटही विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर पाहता येईल. साधारण सोळा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply