Nashik ZP News : जि. प. च्या नव्या इमारतीच्यावाढीव कामासाठी 40 कोटी

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच या इमारतीच्या वाढीव तीन मजल्यांच्या प्रस्तावास राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच या वाढीव तीन मजल्यांच्या कामांसाठी ४०.५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २०१५ मध्ये जिल्हा परिषदेने सहा मजल्यांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी तीन मजल्यांच्या कामासाठी २४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. 

त्यात इमारत बांधकामासाठी२० कोटी रुपये गृहित धरण्यात आले होते. दरम्यान, या इमारतीचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर या नवीन प्रशासकीय इमारतीचे दोन तळमजले वाढविण्यात आले. आगप्रतिबंधक उपाययोजना आदी कारणांमुळे या इमारतीचा खर्च वाढला. यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडून या इमारतीला ४१.६७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली.

 

MNS Vardhapan Din : मनसेचा आज १८ वा वर्धापनदिन, राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार; लोकसभेचं रणशिंग फुंकणार?

यामुळे सध्या नवीन प्रशासकीय इमारतीचे दोन तळमजले व तीन मजले असे बांधकाम सुरू असून, मार्चअखेर ते पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मजल्यांचे काम सुरू असतानाच गेल्या वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मान्यता असलेल्या उर्वरित तीन मजल्यांचेही काम याच कामाबरोबर पूर्ण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनबांधकाम विभागाला दिल्या होत्या. 

त्यानुसार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामाचा आराखडा तयार करून तो ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवला होता. त्या आराखड्यात चौथा, पाचवा व सहावा या तीन मजल्यांसाठी २२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला.

तसेच इलेक्ट्रिफिकेशन, परिसर विकास, सौंदर्यीकरण, बगीचा, सौरऊर्जा प्रकल्प आदी कामांसाठी २१ कोटी रुपये प्रस्तावित होते. ग्रामविकास मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीची बैठक गेल्या आठवड्यात होऊन त्यात ४३ कोटींच्या कामांपैकी ४०.५० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

यामुळे लवकरच ग्रामविकासमंत्री या वाढीव तीन मजल्यांच्या कामास ४०.५ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्याची अपेक्षा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply