Kunal Kamra : कुणाल कामरा कुठे? मुंबई पोलिसांनी पाठवला समन्स, उत्तर देत म्हणाला...

Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. पण तो चौकशीसाठी आला नाही आता कुणाल कामराने पोलिसांच्या समन्सला उत्तर दिले आहे. कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.

सोमवारी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला. खार पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. एकनाथ शिंदेंविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कुणाल कामराला मंगळवारी पोलिसांनी समन्स बजावले. हे समन्स त्याला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आले. कुणाल कामराने पोलिसांच्या समन्सला उत्तर देत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ७ दिवसांचा वेळ मागितला आहे. पोलिसांनी कामराला २५ मार्च रोजीच हजर राहण्यास सांगितले होते. पण तो पोलिस ठाण्यात हजर झाला नाही.

कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो गेल्या वर्षी शेती करण्याच्या उद्देशाने पुद्दुचेरीला गेला होता. तेव्हा कुणाल कामराने सांगितले होते की, 'शेतीशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या समजू शकत नाही.' २३ मार्च रोजी मुंबईतील खारमध्ये असलेल्या 'द युनिकॉन्टिनेंटल' येथे 'नया भारत' नावाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. कुणाल कामराने २३ मार्च रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या शोची लिंक शेअर केली. ४५ मिनिटांच्या या शोची एक क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे गायले होते.

Pune : हिंदू नववर्ष साजरे करण्याचा उपक्रम – वस्त्रदान आणि समाज एकता

कुणाल कामराचे हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेना आक्रमक झाली. शिंदेसेनेने कुणाल कामराच्या स्टुडिओवर हल्ला करत तोडफोड केली. कुणाल कामरावर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे सर्वजण कारवाईची मागणी करत आहेत. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी शिंदेसेनेने केली पण त्याने माफी मागण्यास नकार दिला. शिंदेसेनेकडून कुणाल कामराविरोधात दोन तक्ररी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिस त्याच्याविरोधात पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरेल.

दरम्यान, कुणाल कामरा प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 'ये तो अपून जैसा निकला… ये भी झुकेगा नही साला!! जय महाराष्ट्र!', असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी देखील महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कुणाल कामरा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टॅग केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply