
Kolhapur : गडहिंग्लज शहरातील उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभराची जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते ताणतणावात होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी आपल्या पत्नी व मुलासह विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
संतोष शिंदे यांनी अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन, व्यायाम शाळा, बेकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह मुंबई, कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले.
आज सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने अन्य शेजाऱ्यांना बोलवले असता दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरूममध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन व त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून घेऊन त्यांनी जीवन संपवल्याचे लक्षात येते. घटनास्थळी गडहिंग्लज पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
गडहिंग्लज बंदचे आवाहन
दरम्यान, संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फेरी मारून बंदचे आवाहन करत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
इतर
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- किडनीचे आरोग्य जपा: काही सामान्य औषधेही करू शकतात गंभीर नुकसान, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
- ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेंद्र बोहरा यांचे निधन; अभिनेता करणवीर बोहराची वडिलांना भावनिक श्रद्धांजली
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- मनमाडमध्ये पहाटे थरारक अपघात: मालगाडीची मॅजिकला धडक, वाहन पूर्णतः उद्ध्वस्त पण जीवितहानी टळली.



























Subscribe to my channel

