
मुंबई: जगातील सर्वाधिक सुंदर आणि सर्वांत मोठा कोरलेला हिरा असलेल्या कोहिनूरबाबत अनेक शतकांपासून अनेक गूढ व रहस्यांचे आवरण आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये चुकीच्या पद्धतीने हिरावून घेतलेले भारतातील निर्विवाद प्रकारचे सर्वोत्तम असे वैभव असलेल्या ह्या हिऱ्याबद्दलच्या कहाण्या आणि विरोधाभासांवर प्रकाश टाकला जाणार आहे. डिस्कव्हरी+ प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे फ्रायडे स्टोरीटेलर्स सोबत आणि वैविध्यपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार विजेता व पद्मश्री अभिनेता मनोज वाजपेयी ह्यांच्यासह एकत्र येऊन 'सीक्रेटस' फ्रँचायजीमधील 'सीक्रेटस ऑफ द कोहीनूर' ही रोमांचक डॉक्युसिरीज ४ ऑगस्ट २०२२ ला प्रसारित करणार आहे.
सीक्रेटस ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरीच्या' विलक्षण यशानंतर डिस्कव्हरी+ 'सीक्रेटस' फ्रँचायजीचा विस्तार करून या विलक्षण हिऱ्याचे मूळ आणि मालकी ह्यावर आजसुद्धा सुरू असलेल्या चर्चा समोर आणणार आहे. या डॉक्युसिरीजमध्ये शोधानंतर ह्या हिऱ्याचे वजन कसे कमी होत गेले आणि आज ते मूळ वजनाच्या एक षष्ठांश (१/६) इतकेच उरले आहे; तसेच कोहीनूर, ज्याला आपण आपला स्वत:चा म्हणू इच्छितो तो कदाचित बादशहा बाबरने त्याच्या आठवणींमध्ये उल्लेख केलेला हिरा कदाचित नसू शकेल अशा विषयांवर प्रकाश टाकला जाईल. खासदार आणि लेखक डॉ. शशी थरूर, इतिहासतज्ज्ञ आणि एएमयु, इरफान हबीब, डॉ. एड्रिएन म्युनिच, प्रा. फरहात नसरीन, के. के. मुहम्मद, डॉ. मानवेंद्र कुमार पुंधीर, नवतेज सरना, जे. साई दीपक, डॉ. डॅनिएल किनसी, डॉ. माईल्स आणि मास्टर डायमंड पॉलिशर मिस. पॉलिन विलेम्स ह्यांचा यात समावेश असेल.

राघव जयरथ यांच्या दिग्दर्शनामध्ये या डॉक्युसिरीजमध्ये अनेक सत्ताधीशांच्या कहाण्या आणि कोहीनूर प्राप्त करण्याच्या त्यांच्या अदम्य इच्छा ह्यांचा उलगडा होतो. ज्यामुळे अनेक मोठी रक्तरंजित लढाया झाल्या, एकमेकांवर अनेकदा डावपेच टाकले गेले आणि अनेक प्रबळ सत्ताधीश व राजघराणी उद्ध्वस्तही झाली. ह्या सगळ्यांसह शक्तीशाली सम्राटांचेही जीवन या हिऱ्याभोवती विलक्षण पद्धतीने फिरत राहिले होते. कालातीत तेज असलेल्या कोहीनूरप्रमाणेच सीक्रेटस ऑफ कोहीनूर आपल्या प्रभावी कथा निवेदनामुळे आणि क्रिएटीव्ह स्वरुपामुळे तितकेच खिळवून टाकणारे असेल. पुढील काळामध्ये ते इतिहासप्रेमी, सामान्य लोक आणि इतिहासाचे जाणकार या सर्वांसाठी एक संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.
या डॉक्युसिरीजबद्दल बोलताना कलाकार मनोज वाजपेयी यांनी म्हटलं की, "या फ्रँचायजीमध्ये या विशिष्ट मालिकेला सादर करण्याची संधी अतिशय समाधानकारक आहे आणि मला यातून खूप काही शिकायला मिळाले. त्याबद्दल मी डिस्कव्हरी+ आणि नीरज पांडेंचा मन:पूर्वक आभारी आहे. हा प्रोजेक्ट त्यांच्यासोबतचा माझा दुसरा अनुभव आहे. इतक्या वर्षांपासून त्याबद्दल ऐकूनही कोहीनूरबद्दल अनेक तथ्ये मला माहिती नव्हती आणि मला खात्री आहे की, बहुतांश लोकांनाही ती माहिती नसणार आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये समोर आलेल्या तथ्यांमुळे मला अतिशय धक्का बसला आणि मी ही न सांगितलेली कहाणी दर्शकांनी बघून असेच आश्चर्यचकित होण्याची आतुरतेने वाट बघत आहे."
डिस्कव्हरी वॉर्नर ब्रदर्सचे साउथ एशियाचे फॅक्च्युअल अँड लाईफस्टाईल क्लस्टरचे हेड साई अभिषेक ह्यांनी म्हंटले, "सर्व वयोगटाच्या श्रोत्यांना मोहित करतील अशा विशिष्ट घटकांसह आम्ही आमच्या इतिहास प्रकारामध्ये नवीन मार्गाने पुढे जात आहोत. 'सीक्रेटस' फ्रँचायजीला पुढे नेताना आम्ही आमच्या आधीच अतिशय समृद्ध असलेल्या इतिहास प्रकारामध्ये आणखी एक भारतीय ओरिजिनल आयपी आणली आहे. 'सीक्रेटस ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आम्हांला या विषयाचे सामर्थ्य कळाले व त्यानंतर आम्ही नीरज पांडे आणि मनोज वाजपेयीसोबत यशस्वी भागीदारी सुरू केली. कोहीनूरचा खिळवून ठेवणारा इतिहास व त्याचे समोर न आलेले भाग हे आता अधिक महत्त्वाचे आहेत व जगभरातल्या श्रोत्यांना ते माहिती असणे गरजेचे आहे." भारतातील न सांगितलेली कहाणी- 'सीक्रेटस ऑफ द कोहीनूर' मनोज वाजपेयी होस्ट करेल आणि ती ४ ऑगस्ट २०२२ ला गुरुवारपासून फक्त डिस्कव्हरी+ प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाईल.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




