Junnar Yatra Accident : यात्रेतील बगाड मधोमध तुटलं; आठ-दहा फुटांवरून मानकरी खाली कोसळले अन्...काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Pune Junnar News : पुण्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील यात्रेत पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड अचानक मधोमध तुटलं आणि मानकरी थेट आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघाताच थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल सायंकाळी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

यात्रेचा उत्साह शिगेला पोहचला होता. बगाड ग्रामपंचायतीसमोर आलं होतं. बगाडच्या दोन्ही बाजूला मानकरी होते. आठ ते दहा फूट हवेत मानकरी असताना, बगाड प्रदक्षिणा घेत होतं. तेव्हाच बगाड मधोमध तुटलं आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एका बाजूचे मानकरी आठ ते दहा फुटांवरून खाली कोसळल्याने खळबळ उडाली होती. 

सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. असे असले तर या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप आणि संदीप चिलप हे दोघे या बगाडाला लटकलेले होते. दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मधोमध तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले.

या घटनेत सुनील चिलप यांना जबर मार लागला असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुगणालायत प्राथमिक उपचार करून त्यांना मुंबईला हलवनार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर संदीप चिलप यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply