Jejuri : जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा सोमवारपासून दीड महिना दर्शनासाठी बंद; पुरातत्व खात्याकडून दुरुस्तीच्या कामाची सुरुवात

Jejuri : जेजुरीच्या खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वाची बातमी. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळामध्ये गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून दोन्हीही गाभाऱ्यात जाता येणार नाही.

MNS Jagar Yatra : मनसेचे हे आंदोलन शांततेत, मात्र यापुढे आंदोलन कसं होईल सांगू शकत नाही : अमित ठाकरे

खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना करण्यात येणार असून या विकास कामांसाठी १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे.

या काळात भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. दरम्यान, खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकास कामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी- मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply