Fake Note Case : बनावट नोटांचे जाळे परराज्यात? आणखी दोघांना अटक, एक आरोपी परप्रांतीय

Fake Note Case : बनावट नोटा प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी अजून दोघांना अटक केली. त्यामुळे आता आरोपींची संख्या पाच झाली. यातील एकजण परराज्यातील आहे. त्यामुळे याची व्याप्ती परराज्यातही असू शकते. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. आरोपीने बनावट नोटा छापल्यानंतर मूळ गाव गाठले होते का? तो किती दिवस मूळ गावी राहिला याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी आतापर्यंत राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर) देवेंद्र ऊर्फ भैय्या मोरे (१९, रा. संजयनगर, मुकुंदवाडी), अंबादास रामभाऊ ससाणे ऊर्फ अरुण भास्कर वाघ ऊर्फ मेजर (४२, रा. शाही कॉलनी, पडेगाव मूळ रा. शहर टाकळी ता. शेवगाव जि. नगर),

Pune ISIS Module Case : NIAची मोठी कारवाई! पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात आठव्या संशयित दहशतवाद्याला अटक

राजू श्याम शिंदे (१९, रा. मूळ रा. दरेगाव एमआयडीसी ता. बदनापूर जि. जालना, ह. मु. शहा कॉलनी, पडेगाव) आणि बलराम ऊर्फ करण सुरेश सिंग (४०, रा. राजनगर, मुकुंदवाडी मुळ रा. टेहरा ता. भटणी जि. देवरिया उत्तरप्रदेश) या पाच जणांना अटक केलेली आहे. याशिवाय चार अल्पवयीन बालकांनाही ताब्यात घेतले.

मुख्य आरोपीला पकडण्याचे आव्हान

अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ४३५ बनावट नोटा, मोबाइल, दुचाकी असा सुमारे सहा लाख १५ हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या बनावट नोटा या खऱ्याखुऱ्या नोटांसारख्या दिसतात.

नोटांवरील नक्षीही अगदी हुबेहूब आहे. आरोपींनी नोटा छापण्याचे मशीन कुठून आणले? कुठे-कुठे नोटा चालविल्या, यातील मुख्य आरोपी कोण आहे, नोटा तयार करण्याचा कागद, इतर साहित्य कुठून आणले हा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पांडुरंग भानुदास पाटील (४०, रा. जयभवानीनगर, मूळ रा. रुई-भारडी ता. अंबड, जि. जालना) आणि कुणाल ऊर्फ बंटी विजयदास वैष्णव (३९, रा. न्यू हनुमाननगर) अशी नव्याने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (ता. दोन) न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी दोघांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply