Dhule : तिरंगा फडकविण्याच्या वादातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय तरूणाला समुद्रात फेकलं, कुटुंबियाच्या दाव्याने खळबळ

Dhule News : पाकिस्तान हद्दीमध्ये तिरंगा फडकविल्याच्या वादातून मर्चेंट नेव्हीमध्ये ओएस म्हणून कार्यरत असलेल्या यश देवरे या तरुणाचा घातपात झाला. असा दावा देवरे कुटुंबियांनी केला आहे. ओमेनच्या समुद्रात 28 जानेवारी रोजी यश देवरे बेपत्ता होता. काही दिवसांपूर्वी शिप अधिकाऱ्याने मेलद्वारे त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना सांगितले. पण शिपवरील सहकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिल्याचा दावा देवरे कुटुंबियांनी केलाय.

ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस या कंपनीच्या जहाजावर यश ओएस म्हणून कामाला होता, यशने तिरंगा फडकविल्याचा स्टेट्स देखील आपल्या मोबाईलवर ठेवला होता. त्यादरम्यान कुटुंबीयांशी त्याचा संपर्क देखील झाला होता. परंतु त्यानंतर मात्र कुटुंबीयांशी त्याचा कुठलाही प्रकारचा संवाद झाला नाही. संबंधित शिप अधिकाऱ्यांकडून मेलद्वारे यश देवरे हा पाय घसरून समुद्रात पडला असून, त्याचा कुठलाही थांग पत्ता लागत नसल्याची माहिती मेलद्वारे कुटुंबीयांना देण्यात आली होती.

Jalna Police : निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब; जालना पोलिसात खळबळ, मिसिंगची तक्रार दाखल

ओमेनच्या समुद्रात 28 जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या मर्चेंट नेव्हीचा कर्मचारी यश अविनाश देवरेचा (21) अजूनही शोध सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी एम. टी. अथेना-1 या जहाजावर त्याने तिरंगा फडकावला होता. मात्र, तेथील आठ पाकिस्तानींनी त्याच्याशी वाद घालून हा राष्ट्रध्वज काढून टाकण्यासाठी धमकावले होते.

पण यश ठाम होता आणि याच कारणावरून जहाज पाकच्या सागरी हद्दीत असताना त्याचा घातपात झाला असावा अशी तक्रार यशचा भाऊ नयन देवरे यांनी दिली आहे. जहाजावर यशसोबत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनीही माहिती दिल्याचा त्यांचा दावा आहे, ठाणे येथील सागरी हद्द असलेल्या मालपाडा पोलिसांनाही त्यांनी याबाबतचे पुरावे देऊन तक्रार दाखल केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply