Devendra Fadnavis : दिल्लीतील महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत नेमकं काय झालं? देवेंद्र फडणवीसांनी सर्व उलगडून सांगितलं

Devendra Fadnavis : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये राज्यातील लोकसभेच्या जागावाटपावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं, याविषयी उपमुख्यमंत्रीफडणवीस  देवेंद्र यांनी सर्व उलगडून सांगतिलं. 

दिल्लीत राज्याच्या लोकसभेच्या जागावाटपावर महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. दिल्लीत जागावाटपावर झालेली बैठक नेमकी कशी झाली, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली.

Nagpur News : धक्कादायक! उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा; नागपुरातील घटना

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'दिल्लीत महायुतीची राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाची बैठक सकारात्मक झाली. एकाच बैठकीत सर्व निर्णय होतील असं मी म्हणू शकत नाही. आमचं ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. आता फक्त उर्वरित २० टक्के काम बाकी आहे. आमचं आपापसात बोलणं सुरु आहे. आमचे थोडे फार विषय बाकी राहिले आहेत. मला विश्वास आहे की, हे सर्व विषय लवकरच पूर्ण होतील'.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मनसेची व्यापक भूमिका घेतली आहे. मनसेची भूमिका ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी नाही. आम्ही प्रादेशिक अभिमानावर विश्वास ठेवतो. आमचंही म्हणणं आहे की, राज्यात मराठी माणसांच्या हक्कांचे रक्षण झालं पाहिजे. त्यांनी व्यापाक भूमिका बजावली आहे.

'मनसे 'मराठी माणूस', आणि 'हिंदुत्व' या विषयावर भाष्य करते. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या भूमिकेमध्ये फारसा फरक नाही. निवडणूक म्हटलं तर तो चर्चेचा विषय आहे. याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात, असेही ते म्हणाले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply