Devendra Fadanvis : 'ग्रीन हायड्रोजन संदर्भात मोठे निर्णय; २ लाख ७६ हजार कोटींचे विक्रमी करार..' देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

Devendra Fadanvis : एक्सलर मित्तल निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 6 मिलियन टन ग्रीन पोलाद प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार असून राज्यात 20,000 रोजगार निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीने तीन महत्वाचे करार झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. यात ग्रीन हायड्रोजन विषयात 2 लाख 70 हजार कोटी गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये यात एनटिपीसी सह 7 मोठ्या कंपन्यांचा समावेश असून 63 हजार 900 रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रांत अग्रणी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Malad Fire : आगीचं सत्र सुरुच! मुंबईतील मालाडमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

 

आणखी एक मोठा करार आर्सेनल मित्तल सर्वात मोठ्या स्टील कंपनीसोबत करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 6 मिलियन टन स्टील प्लांटसाठी गुंतवणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. तसेच तिसरा कार्यक्रम 'मित्र'च्या वतीने कृषिमूल्य साखळी कार्यक्रमचा करार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोबत कृषिमूल्य साखळी तयारी करायची कार्यक्रम सुरू होतोय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply