Pune Crime : धक्कादायक! शिक्षकाकडे तक्रार केल्याचा राग; बलात्कार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी

Daund : पुण्याच्या दौंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. त्याच शाळेमध्ये दुसऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला १०० रुपये देऊन ही सुपारी देण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर दौंड पोलिसात मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बुधवारी २२ जानेवारी रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला. मात्र आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून केला गेला. मात्र विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांना धक्का बसला. त्यांनी थेट दौंड पोलिस ठाण्यात धाव घेत मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकांविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. दौंड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी ही माहिती दिली.

Accident News : अकोट आणि सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. हा विद्यार्थी आणि त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि त्यानंतर तिला मारून टाक यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली.

पण ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला जाऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दिली. यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply