Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस फेकला, नाशिकमध्ये गदारोळ

Amravati : अमरावतीमध्ये ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु आहे. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज हमीभावात सोयाबीन विक्रीचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा शेतमालाला अपेक्षित भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनला ८,०००; कापसाला १०,०००; तूरीला प्रति क्विंटल १२,००० भाव देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आज जोरदार आंदोलन केले आहे.

Bangladesh Clashes : भाषण सुरू होण्याआधी बांगलादेशात वडिलांचं स्मारक जाळलं; संतापलेल्या शेख हसीना यांनी भारतातून दिला इशारा

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधार जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान पोलिस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सौम्य बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे अमरावतीचे जिल्हा प्रमुख पराग गुधडे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडून आत घुसले. त्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आणि गहू सोबत आणले होते. दरम्यान मंत्री दादा भुसे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनांवर कापूस, तूर, सोयाबीन फेकले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply