Bus Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, ३० जखमी

Bus Accident : लातूर येथून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटनापुणे-सोलापूर महामार्गावर  गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. सत्याभामा बोयने (वय ७२ वर्ष), श्वेता पंचाक्षरी अशी मृत महिलांची नावे आहेत. तर बाळासाहेब शिरखाने रा.सोलापूर हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

DHFL Bank Scam Case : DHFL घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; वाधवान बंधूंची ७०.३९ कोटींची मालमत्ता जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लातूर येथून पुण्याच्या दिशेने येत होती. या बसमधून ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बस दौड तालुक्यातील पाटस घाटात आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.

हा अपघात इतका भीषण होता, की बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यावेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य ३० प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर प्रवाशांनी घटनास्थळावर आक्रोश केला होता. ही दृश्य मन हेलावून टाकणारी होती.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिकांच्या मदतीने बसमधील जखमी व्यक्तींना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर पसरलेले गेले. शिवाय खासगी बस रस्त्यात उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply