Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंग यांच्या अडचणीत वाढ? 7 सदस्यीय समिती आरोपांची चौकशी करणार

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला पहलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण शरण सिंहला हटवण्यात यावं तसंच भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात यावा या मागणीसाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राजधानी दिल्ली इथल्या जंतरमंतरवर धरने आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.

त्या दरम्यान भारतीय ऑलम्पिक संघाने 7 सदस्यीय समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात एका समितीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. ही समिती बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करेल. या समितीत मैरी कॉम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि कायदा तज्ज्ञांचा समावेश असेल.

दरम्यान काल पहिलवानांच्या या सर्व समस्या ऐकून घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सर्व खेळाडूंना जेवनासाठी बोलावलं होतं. मात्र, या डीनर डिप्लोमसीमध्येही कुठलाही तोडगा निघाला नसल्याचं खेळाडूंनी सांगितलं. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 72 तासाचा वेळ दिला आहे. तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना वेळ द्यायला हवा असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, सरकारने या संदर्भात तात्काळ निर्णय घेतला नाही तर खाप पंचायत देखील खेळाडूंच्या समर्थनार्थ दिल्लीच्या जंतर मंतर वर आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आज बृजभूषण शरण सिंह या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होते मात्र, त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply