Bribe Case : आरोग्य कॅम्पसाठी २० हजाराची लाच; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

Bribe Case : आरोग्य कॅम्प लावण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी  जालना जिल्ह्यातील अबंड येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आवारात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह  कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक संभाजीनगर विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली.

तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री आणि जामखेड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये मानव विकास अंतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिराची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड, जालना येथे पाठविण्या करिता आरोग्य अधिकारीच लाचं होते. यामुळे दाद मागायची कुणाकडे म्हणून या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या नंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेने आरोग्य विभागतील लाचखोरीपणा समोर आला आहे.

Lok Sabha Election 2024 : सोशल मीडियावर पोलीस ऑन ड्यूटी 24 तास; अक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल

वैद्यकीय अधिकारी डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे व कनिष्ठ सहाय्यक पंडित भीमराव कळकुंबे असं ताब्यात घेण्यात आलेल्यांचे नाव असून आरोग्य कॅम्प घेण्यासाठी प्रत्येक कॅम्पचे एक हजार रुपय या प्रमाणे २५ कॅम्पसाठी २५ हजार रुपयांची मागणी या दोघांनी केली होती. तडजोडअंती २० हजाराची लाच घेताना या दोघांना पंचासमक्ष अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपक यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस करत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply