Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! संतोष देशमुखांनंतर पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार, एकाचा मृत्यू

Beed : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीमुळे झाली होती त्यावरूनच पुन्हा राडा झाला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटे आले होते. या चोरट्यांवर पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची ही आणखी एक गंभीर घटना आहे. बीड तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात असलेल्या पवनचक्की प्लँटच्या परिसरात हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply