Beed :विठ्ठलाच्या नगरीत शेवटचा श्वास, वारकरी महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संपूर्ण पंढरी हळहळली

Beed : पायी वारी करत पंढरपूरला विठूराया आणि रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेने विठ्ठलाच्या पंढरीत शेवटचा श्वास घेतला. या महिला भक्ताचा पंढरपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. द्वारका चव्हाण (वय ६१, रा.जातेगाव, ता.गेवराई, जि.बीड) असं या महिलेचं नाव असून या दुर्दैवी घटनेबद्दल पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

द्वारका चव्हाण या गावातील विनायक महाराड मरकड यांच्या दिंडीत सहभागी होत्या. मागील २० दिवसांपासून ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत त्या काल बुधवारी पहाटे पंढरपुरात पोहोचल्या होत्या. त्यानंतर चंद्रभागेत त्यांनी आंघोल करुन पांडुरंगाला प्रदक्षिणा घातल्या. पंढरपुरातील लाखो वारकऱ्यांचा आनंदमय सोहळा पाहून या वारकरी महिलेचा विठ्ठल नगरीत मृत्यू झाला. या वारकरी महिलेच्या आकस्मिक मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Indian Railway : रेल्वेप्रवाशांच्या कामाची बातमी! प्रवासात 'हा' अ‍ॅप ठरतोय फायदेशीर, तक्रारीचं झटपट सोल्युशन

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा केली यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्यानंतर रुक्मिणी मातेची दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आला. दरम्यान प्रसाद म्हणून श्रीफळ, तुळशीहार आणि पुष्पहार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले आहे. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील बाळू शंकर अहिरे वैभव (वय ५५) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य गेल्या १६ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply