Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! १४ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार, भारतीयांना तिकडे न जाण्याचा सल्ला

Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार (Bangaladesh Violence) उफाळला आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये १४ पोलिस (Bangaladesh Police) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंसाचारामुळे बांगलादेशमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशामध्ये रविवारी भारत सरकारने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने आपल्या ॲडव्हायझरीत आपल्या नागरिकांना पुढील माहिती मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बांगलादेशच्या विविध भागात सुरक्षा दल आणि सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर झालेल्या चकमकीत १४ पोलिसांसह ९० जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये नागरिकांनी आंदोलन करत पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरूनच आता बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे.

Pune : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एकॲडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार, 'बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेला हिंसाचार लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही अडचणी असल्यास ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहावे असा सल्ला देण्यात आला आहे.

बांगलादेशातील वादग्रस्त नोकरी कोटा योजनेच्या विरोधात गेल्या महिन्याापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाचे रूपांतर सरकारविरोधी आंदोलनात झाले आहे. २५ जुलै रोजी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता सुमारे ६,७०० भारतीय विद्यार्थी बांगलादेशात परतत आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी रविवारी सांगितले की, 'बांगलादेशमधील हिंसाचार संपला पाहिजे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो बांगलादेशी आंदोलकांवर रविवारी सरकारी समर्थकांनी हल्ला केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply