Bandra - Worli Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी; आत्महत्येचं कारण काय?

Bandra - Worli Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश सिंह असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी अपम्रूत्यूची नोंद केली आहे. आकाश सिंह हा परळचा रहिवासी होता. माझा मोबाईल खाली पडला आहे असं सांगून तो सी लिंकवर टॅक्सीतून उतरला. त्यानंतर त्याने उडी मारली. मच्छीमार नौकांच्या मदतीने पोलिसांनी म्रूतदेहाचा शोध घेतला आहे.

Weather Update: राज्यात हुडहुडी! दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याच्या थंडीची शक्यता

सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना तरुणाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ पसरली आहे. त्याने आत्महत्या नेमकी का केली याबाबत पोलीस अधिक तपास करतायत. तरुणांमधील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसत आहे. अपयश आणि कुटुंबातील वाद विवाद अशा विविध समस्यांमुळे तरुण वर्ग टोकाचं पाऊल उचलत आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply