Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल !

Anil Deshmukh :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कारण परमबीर सिंह प्रकरणात त्यांना क्लीनचीट दिल्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांची सून आणि मुलीविरोधात सीबीआयनं खटला दाखल केला असून यातील आरोपपत्रात या दोघींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयनं अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. पण या प्रकरणात त्यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचा सीबीआयचा अंतर्गत अहवाल ऑगस्ट 2021 मध्ये मीडियामध्ये लीक झाला होता. या अहवाल लीक प्रकरणात देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्या नावाचा पुरवणी आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

Maratha Rervetation : “म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सुचत नाही”, मनोज जरांगेंची नेमकी कोणावर टीका? म्हणाले, “आपण कोणाचं नाव…”

सीबीआयचा आरोप काय?

अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयनं अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सबइन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. यात सोमवारी सीबीआयनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

त्यात अनिल देशमुख यांनी मुलगी पूजा आणि सून राहत ऋषी देशमुख यांनी अभिषेक तिवारी या व्यक्तीकडून अहवाल मिळवत त्याचे व्हिडीओ काढूला नंतर त्यांनी तो सोशल मीडियावर टाकण्यात आला होता, असा आरोपात उल्लेख आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्या इतर दोन नातेवाईकांचाही यात समावेश आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply