Amol Mitkari News : दादांवर काय बोलता, त्यांनी तुम्हाला कामाला लावलं...; अमोल मिटकरींची कोल्हेंवर टीका

Amol Mitkari News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू असल्याचं दिसतंय. अशात दादांनी तुम्हाला कामाला लावलं आहे. त्यामुळे दादांना बोलताना थोडं सबुरीने घ्या, असं म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी डॉ.अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चाला शिवनेरी येथून बुधवारी ( २७ डिसेंबर ) सुरूवात झाली. यावेळी अमोल कोल्हेंनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्र सोडलं. त्यांच्या टीकेला आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं ठरलं! जयंत पाटलांची 'मातोश्री'वर बैठक; राऊतांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

अमोल कोल्हेंनी यावेळी घेतलेल्या सभेमध्ये नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावरून अमोल मिटकरी म्हणाले की, "सर्कशीतला वाघ आणि जंगलातला वाघ कोण आहे? हे बारामतीकरांना माहित आहे. आपण चार वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत. कोल्हे साहेबांना आणि सुप्रिया सुळे यांना जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ पळ पाळाव लागत असेल, तर हेच दादाचं वेगळं पण आहे."

तसेच अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना थोडं सबुरीने घेतलं पाहिजे, असा इशाराही अमोल मिटकरींनी यावेळी दिला आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते?

वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा राजा वाटतो. हाच वाघ जेव्हा पिंजऱ्यात असतो तेव्हा केवळ गुरगुरांव लागतं. जेव्हा सर्कशीत तोच वाघ रिंगमास्टरच्या इशा-यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला घरे पडतात, की ज्या वाघावर प्रेम केलं त्याला आज रिंगमास्टरच्या इशा-यावर चालाव लागतं. जेव्हा हाच वाघ पिंज-यात बघायला मिळतो.", अशा शब्दांत अमोल मिटकरींनी नामोल्लेख टाळून समाचार घेतला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply