America : ४ कोटीचे आंबे अमेरिकेच्या विमानतळावरच अडकले; एका चुकीमुळे भारताच्या निर्यातदारांना फटका

America : महाराष्ट्रातील आंबे हे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरातून आंब्याच्या ऑर्डर्स येतात.दरम्यान, आता भारतातून अमेरिकेत पाठवलेला आंबा अडवण्यात आला आहे. भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास ४ कोटी २८ लाख रुपयांचा आंबा तेथील विमानतळावर थांबविण्यात आला.

काही कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तेथील यंत्रणांनी नकार दिला आहे. सर्व माल तेथेच नष्ट करावा लागला आहे. यामुळे निर्यातदारांना नुकसान सहन करावे लागले.

अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकीरण केंद्र सुरू केले आहे. येथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंब्यावर विकीरण प्रक्रिया केली जाते.कागदपत्रांमधील त्रुटीमुळे बसला फटका बसला आहे.

मे महिन्यात लॉस एंजिल्स, सॅन फ्रान्सिस्को व अटलांटा विमानतळावर आंबे पाठवण्यात आले आहे. जवळपास ४ कोटी २८ लाख रुपयांचे आंबे तेथील प्रशासनाने स्वीकारण्यास नकार दिला.

अमेरिकेत आंबा पाठवताना विकीरण प्रक्रिया केल्यानंतर आवश्यक पीपीक्यू २०३ अर्जावर सह्या करणे गरजेचे आहे. परंतु या कागदपत्रांमध्ये काही अडचणी आढळल्यामुळे हा आंबा स्वीकारण्यास नकार दिला.

अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक होता. त्यामुळे तो आंबा तेथेच नष्ट करावा लागला आहे. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रातील आंब्याची प्रचंड मागणी आहे. हापूर, तोतापुरी असे वेगवेगळे आंबे मागवले जातात. या आंब्यांची दूर परदेशात निर्यात केली जाते. परंतु अशाप्रकारे जर आंबा घेतला नाही तर त्याचे खूप नुकसान होते. आंबा हे फळ जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे तो वेळीच खाल्ला पाहिजे. परंतु आता कागदपत्रांमधील चुकांमध्ये सर्व आंबा फेकून द्यावा लागला. यामुळे निर्यातदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply