Ajit Pawar News : अमित शहांसोबतची दिल्लीतील भेट लांबणीवर का पडली? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar News : राज्यात निर्माण झालेल्या शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. मात्र, अचानक त्यांची भेट लांबणीवर पडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, अमित शहा यांच्यासोबतची भेट लांबणीवर का पडली? यावर स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज भल्यापहाटे पुण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या चेंबरमुळे व्यक्त केली. हे चेंबर तातडीने काढून टाका अशा सूचना देखील अजित पवार यांनी आयुक्तांना दिला. चेंबरच्या जागी सलग फरशी बसवा, असे आदेश देखील अजित पवारांनी दिले.

Jammu Kashmir Infiltration : भारतीय जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव; साथीदाराचा मृतदेह सीमापार फरफटत नेत दहशतवादी पळत सुटले

अमित शहांसोबतची भेट लांबणीवर का पडली?

राज्यातील शेतकरी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तुम्ही दिल्लीत जाऊन केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते, मग ही भेट लांबणीवर का पडली? असा प्रश्न पत्रकारांनी अजितदादांना विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, अमित शहा यांचे राज्यसभा आणि लोकसभेत काम सुरू आहे.

"त्यामुळे ते आता भेटणार नाहीत. त्यांचं काम झालं की, ते आम्हाला भेटायला दिल्लीत बोलावणार आहे. मी आज पुण्यात असून उद्या बारामती दौऱ्यावर राहणार आहे. यादरम्यान, अमित शहांचा फोन आला तर आम्ही आमचे दौरे रद्द करून अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणार आहे", असं अजित पवार म्हणाले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply