Ajit Pawar Banner : जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… पुण्यात अजित पवार यांचे बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची राज्याच्या राजकारणामध्ये तुफान चर्चा आहे. या सर्व चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पडदा टाकला होता. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे पुण्यातील कोथरूड परिसरात झळकलेले बॅनर आहे. 

अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यातील कोथरूड परिसरात झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काल सकाळच्या मुलाखती मध्ये अजित पवारांनी यांनी राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे असं वक्तव्य केलं होत त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. 

काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला, आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत केलं.

यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. ज्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाली. त्यावर मला भाष्य करायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, मुख्यमंत्री पदावर आमचा अजूनही दावा असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply