Ahmednagar : संगमनेरमधील 'भगवा' मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, अनेक गाड्यांचं नुकसान

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्हजिहाद विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी आज कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चाला गालबोट लागलं आहे.

संगमनेर शहराजवळील समनापूर गावात दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला आहे. अनेक गाड्यांचे यात नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. सध्या समनापूर गावात तणावाची परिस्थिती आहे. मोर्चादरम्यान वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

मोर्चाचा हेतू काय?

हिंदु समाजावर होणारे हल्ले, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद या प्रवृत्तीच्या विरोधात हा भगवा मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात सहभागी हाेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील अनेक गावांत आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या माेर्चात महिला आणि युवती देखील माेठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा प्रदीर्घ काळासाठी पाठीशी घातले जातात तेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातात. गमनेर शहरात जो जनआक्रोश झालाय तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई न होणे, पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे यामुळे झाला आहे, असं भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलं. (Maharashtra News)

महाविकास आघाडीच्या कालावधीत पोलींसावर दबाव टाकला गेला. कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय छोट्या गोष्टीहून मोठ्या प्रकारचे वाद होत नाहीत, असा प्रत्यक्ष निशाणा सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर साधला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply