Ahilyanagar Crime : स्विमिंग पुलाच्या चेंजिंग रूममधून आरटीओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरी; चार तासातच पोलिसांकडून पर्दाफाश

Ahilyanagar Crime : सुटीचा दिवस असल्याने सायंकाळच्या सुमारास स्विमिंग पूलमध्ये आरटीओ अधिकारी व त्यांच्या मित्र पोहण्यासाठी गेले होते. या दरम्यान पोहायला गेलेल्या आरटीओ अधिकाऱ्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चेंजिंग रूममधून चोरून नेली होती. मात्र या घटनेचा तपास करत तोफखाना पोलिसांनी अवघ्या चार तासात चैन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अहिल्यानगराचे आरटीओ अधिकारी संकेत सुनिल मारवाडी हे त्याच्या मित्रासह रविवारी सायंकाळी शहरातील खाजगी स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी गेले होते. पोहायला उतरण्यापूर्वी त्यांनी त्यांचे कपडे व गळ्यातील सोन्याची चैन एका बॅगमध्ये भरून चेजिंग रुममध्ये काढून ठेवली होती. हि संधी साधत चोरट्यानी बॅगमध्ये ठेवलेली सोन्याची चैन काढून पसार झाले होते.

Crime : साताऱ्याच्या पोरांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार

बॅगेत दिसली नाही चैन

स्विमिंग झाल्यानंतर संकेत मारवाडी हे पुन्हा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी आले. त्यांनी बॅगेत ठेवलेले कपडे काढल्यानंतर सोबत ठेवलेली चैन दिसून आली नाही. शोधाशोध केली असता चैन चोरीला गेल्याची घटना त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी स्विमिंग पूलवर धाव घेत संशयित लोकांची विचारपूस केली.

चार तासात चोरीचा तपास

पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्या ठिकाणी पोहायला आलेला विवेक विजय वहाडणे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. यामुळे पोलिसांनी त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलीस खाक्या दाखवताच त्याने चैन चोरी केल्याची कबुली दिली. यामुळे आरटीओ अधिकाऱ्याची चोरीला गेलेली चैन मिळून आली. अवघ्या चार तासात तोफखाना पोलिसांनी या चोरीचा तपास लावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply