Kolhapur : कोल्हापुरात भरधाव चारचाकी ओढ्यात कोसळून दोघे ठार, नवी कार घरी आणण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Kolhapur News : भरधाव असलेली चारचाकी पलटी मारत ओढ्यात कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे.

यामध्ये तांबळे अनुप खुर्द येथे राहणारे 22 वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. आज दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चार चाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र दासेवाडी इथ आल्यावर आदीलचा भरधाव गाडीवरील ताबा सुटला. 

Cm Eknath Shinde: मुंबई - नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा, मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

त्यानंतर गाडी पलट्या मारत एका पुलावरून ओढ्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाला. 

आज सायंकाळी आदिल आपल्या कुटुंबियांसमवेत कोल्हापूरला नवीन चार चाकी आणण्यासाठी जाणार होता. मात्र नवीन चारचाकी आणण्यापूर्वीच आदिलसह जहीर याच्यावर काळाने घाला घातला. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *