Mumbai Local Train : मुंबईकरांचा रविवारी होणार खोळंबा, उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा वेळापत्रक

Mumbai Local Train : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रेल्वेने आज शनिवारी पश्चिम रेल्वे मार्ग आणि रविवारी मध्य तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान, काही रेल्वेगाड्या उशिराने धावणार असून काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

Bajaj Freedom : जगात प्रथमच बाईकला 'सीएनजी'चा बूस्टर; नितीन गडकरींच्या हस्ते बजाज 'फ्रिडम'चे अनावरण

या ब्लॉकदरम्यान लोकल ठाणे ते कल्याण  स्थानकांदरम्यान सर्व ट्रेन डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर देखील रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीतपनवेल, बेलापूर, वाशी येथून CSMT मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.

त्याचबरोबर CSMT कडून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावणार आहे.

पश्चिम रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. ६) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालण्यात येतील.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply