Crime News : धक्कादायक! मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत

Crime News : मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी श्रावणकुमार विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली आहे. जनरल डब्यात आरोपीने पीडित महिलेची छेड काढली होती. 

धावत्या लोकल ट्रेनच्या खचाखच भरलेल्या जनरल डब्यात सोमवारी रात्री एका २८ वर्षीय पुरुषाने एका महिला प्रवाशाची छे़ड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली. २५ वर्षीय पीडित महिला ऑफिसमधून तिच्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत प्रवास करत होती. रात्री आठच्या सुमारास वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी सांगितलं  की, आरोपी श्रावणकुमार विश्वकर्मा हा गोरेगावकडे जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेनमध्ये वांद्रे येथे चढला होता.

Krushi Utpanna Bazar Samiti : नाशकातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प, 100 कोटींचे नुकसान

तो पीडित महिलेच्या जवळच्या पॅसेजमध्ये उभा राहिला. तिला अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या तिच्या सहकाऱ्याने सहप्रवाशांसह त्यालापकडले. त्याला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी मूळचा जोगेश्वरीचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. लैंगिक छळाच्या आरोपाखाली आरोपीवर आयपीसी कलम 354 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply