PM Narendra Modi : मी संपूर्ण तयारीनीशी आलोय, PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Narendra Modi : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आरक्षण ते लोकशाहीपर्यंत सर्वच मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करताना, मी संपूर्ण तयारीनीशी आलोय, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. मी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विशेष आभार व्यक्त करतो. मी खूप लक्षपूवर्क आणि आनंदाने ऐकत होतो. लोकसभेत मनोरंजनाची कमतरता होती, ती राज्यसभेत भरून निघाली आहे.

२. मी नम्रतापूर्वक एक एक शब्द ऐकत आहे. परंतु तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही.

Crime News : धक्कादायक! दार्जिलिंगच्या तरुणीवर दिल्लीत आठवडाभर बलात्कार; टॉर्चर केलं, अंगावर उकळती डाळ फेकली

३. काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये ओबीसींना आरक्षणापासून दूर ठेवलं. ३७० कलम हटविल्यानंतर एससी, एसटी, ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे, ज्यांना आधी रोखलं होतं.  

४. मी आदरणीय जवाहर नेहरू यांची खूप आठवण काढतो. जवाहरलाल नेहरू यांनी एका मुख्यमंत्र्यांला चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, मला आरक्षण पसंत नाही. विशेष म्हणजे नोकरीत आरक्षण बिलकूल आवडलेले नाही'.

5. काँग्रेस सध्या जातीच्या मुद्द्यावर बोलत आहे. त्यांना याची गरज का पडली. काँग्रेस जन्मापासून दलित,मागासवर्गीय आणि आदिवासी समाज्या विरोधात आहे. मी विचार करतो की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर एससी-एसएसटी वर्गाला आरक्षण मिळालं नसतं.

६. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नव्हता. ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना भारतरत्न देत होते. काँग्रेसला त्यांच्याच नेत्यांवर गॅरंटी नाही. ते लोक मोदींच्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

७. काँग्रेस पक्षाचे विचार कालबाह्य झाले आहेत. त्यांनी त्यांचं कामकाज देखील कालबाह्य केलं आहे. आज खूप मोठ्या मोठ्या वार्ता होतात. काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा गळा आवळला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply