मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या सारीपाटावर राजकीय पुनर्वसनाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवला आहे. यानुसार महायुती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक आले आहेत. या स्वीकृत नगरसेवकांच्या पदांपैकी पहिल्या जागेसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे ते शिंदेंचे पहिले शिलेदार ठरले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ५ मधून राज सुर्वे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, ऐनवेळी राजकीय गणिते बदलली. त्यामुळे या ठिकाणी संजय घाडी यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे सुर्वे समर्थक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी तसेच येत्या काळात याचा फटका पक्षाला बसू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे.
कोण आहेत राज सुर्वे?
- राज सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र आणि युवासेनेचे सक्रिय नेते आहेत.
- राज सुर्वे हे युवासेनेचे उत्तर मुंबईतील प्रमुख चेहरा मानले जातात. मागाठाणे आणि दहिसर पट्ट्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच राज सुर्वे यांची तरुणांमध्ये चांगली आणि मजबूत पकड आहे.
- वडील प्रकाश सुर्वे यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांचा वारसा राज सुर्वे समर्थपणे पुढे नेत आहेत. स्थानिक स्तरावर आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांत ते नेहमीच अग्रभागी असतात.
- राज सुर्वे यांची महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी कापली गेली होती. मात्र त्यांनी बंडखोरी न करता त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. त्यांच्या याच निष्ठेचे फळ म्हणून त्यांना आता मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवण्यात येणार आहे.
शिंदेंनी आखली मोठी रणनीती
दरम्यान राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळाल्याने शिवसेनेची उत्तर मुंबईत ताकद टिकवून ठेवण्यात मदत होणार आहे. त्यासाठी शिंदेंनी ही मोठी रणनीती आखली आहे. राज सुर्वे यांच्या नियुक्तीमुळे मागाठाणे भागातील कार्यकर्त्यांमध्ये बूस्टर डोस मिळाल्याचे वातावरण आहे. दरम्यान दुसऱ्या स्वीकृत जागेसाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
[embedded content]
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel